संगमेश्वर : माभळे पुर्नवसनातील कॉजवे खचला

संगमेश्वर ः संगमेश्वरजवळच्या माभळे पुनर्वसनमधील वर्षभरापूर्वी बांधलेला कॉजवे (छोटा पूल) खचला असून एकूणच बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

माभळे येथील झिमाजी पाताडे यांच्या घराजवळ सन २०२२-२३ मध्ये जिल्हा वार्षिक नियोजनमधून या पुलासाठी दहा लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या पुलाचे भूमीपूजन तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले होते. ठेकेदाराने दोन महिन्यात कॉजवेचे काम घाईगडबडीत केल्यानेच हा कॉजवे खचला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ठेकेदाराच्या या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:39 11-03-2025