रत्नागिरी : Shimgotsav 2025 | कोकणातील सर्वात मोठा सण आणि कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला शिमगोत्सवाला खर्या अर्थाने मंगळवारपासून (दि. ११) सुरुवात झाली आहे. मंगळवारी गावोगावी तेरसे शिमगे रंगलेले पहायला मिळाले. तर काही ठिकाणी भद्रेचे शिमगे १४ तारखेला होणार आहेत. ठिकठिकाणी पालखी भेट, होळी उभी करणे, फिरते खेळ पहायला मिळत असून, संपूर्ण कोकणातील वातावरण ढोल-ताशांच्या गजराने घुमत आहे.
गेल्या अनेक वर्षाची परंपरा, चालीरिती यातून साजरा होणार्या शिमगोत्सवाला गेल्या आठ दिवसांपासून सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी फाका घुमू लागल्या आहेत. या शिमगोत्सवाला खर्या अर्थाने मंगळवारपासून रंग चढला आहे. तेरसे शिमग्याला सुरुवात झाली आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रथेपरंपरेनुसार हा उत्सव साजरा केला जातो.
दरम्यान, हजारो भाविकांच्या उपस्थितीत नाचणे व मिरजोळे येथील पालखी भेटीचा सोहळा उत्साहात रंगला. सुखावणारे असे हे दृश्य भाविकांनी टिपले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 12-03-2025














