खेड : काजवेवाडी-पुणे चिंचवड बसफेरी सुरू

खेड : तालुक्यातील काडवली गावातील काजवेवाडीमधून पुणे पिंपरी-चिंचवड एसटी बससेवेचा शुभारंभ नुकताच काजवेवाडी येथे करण्यात आला. काडवली, कुंभवली, निरबाडे, केळणे, आंबडस, पाली, खांदाट, भेलसई, दळवटणे, कळंबस्ते अशा अनेक गावातील जनतेला पुणे येथे जाण्यासाठी ही बसफेरी उपयुक्त ठरणार आहे. यावेळी बस चालक निकम व वाहक पिटले यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि. प. सदस्य कृष्णाजी लांबे, पोलिस पाटील राकेश मांजरेकर, रमेश मांजरेकर, श्री हनुमान ट्रस्टचे अध्यक्ष सदानंद गोरखे, ग्रामविकास मंडळ काजवेवाडी काडवलीचे अध्यक्ष मनोज काजवे, वसंत रामाणे, राजाराम काजवे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 12/Mar/2025