संगमेश्वर : कुरधुंडाच्या सरपंचपदी नाझिमा बांगी यांची बिनविरोध निवड

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कुरधुंडा गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचात सदस्या नाझिमा हसन बांगी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालकमंत्री ना. उदय सामंत आणि आ. किरण सामंत यांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असून, पाणी आणि आरोग्य, शिक्षण, शासकीय योजना हा अजेंडा घेऊन पुढे जाणार असल्याची प्रतिक्रिया बांगी यांनी दिली. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या आदेशानंतर देवरूखचे नायब तहसीलदार सुदेश गोताड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड झाली. यावेळी प्रभारी सरपंच तैमूर अलजी, माजी सरपंच सबा अलजी, जमूरत अलजी, शाहिस्ता एलजी, पोलिस पाटील नफिसा फकीर, नाझीम अलजी, ग्रामसेवक श्रेया भायजे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 13/Mar/2025