देवरूख : माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या सदस्यांनी घेतली. राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे सरचिटणीस आणि रत्नागिरी जिल्हा निरक्षक बबन कनावजे यांच्या पुढाकाराने ही भेट घेण्यात आली. यावेळी श्री. कनावजे यांचे सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, दीपक पवार, मंगेश बाईत, राकेश शिर्के, हे उपस्थित होते. मागील दीड वर्षांपासून या संघटनेचे सर्व सदस्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधी एकजुटीने आपल्या मागण्यांचा विचार कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाने लवकरात लवकर करावा यासाठी निवेदन, प्रस्ताव, आंदोलन, उपोषण, बैठका सर्व गोष्टी करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 13/Mar/2025














