चिपळूण : चिपळूण तालुक्यातील तोंडली वारेली या दुर्गम अशा गावात शनिवारी मध्यरात्री बिबट्याने एका घरात शिरुन घरातील व्यक्तीवर हल्ल्याची थरारक घटना घडली. यावेळी अचानक बिबट्याने एका घरात शिरून घरातील व्यक्तीवर हल्ला केल्याने या घरातील आशिष शरद महाजन हे गंभीर जखमी झाले. मात्र, त्यांनी न घाबरता धीटपणे बिबट्याचा हल्ला परतवून लावण्यासाठी प्रतिहल्ला चढवला. यामध्ये आशिष महाजन हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, बचावासाठी केलेल्या प्रतिहल्ल्यात बिबट्याचाही मृत्यू झाला आहे. बिबट्या आणि मानवातील संघर्ष किती तीव्र झाला आहे, हे दर्शवणारी ही घटना आहे. दरम्यान, यानंतर ही घटना वन विभागास कळविण्यात आली आणि महाजन यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दोघांत मोठी झटापट … महाजन यांनी कुटुंबियांना वाचवण्यासाठी व आपल्या बचावासाठी बिबट्यावर जोरदार हल्ला चढवला. त्या दोघात मोठी झटापट झाली. यामध्ये बिबट्याने त्यांच्या हातावर, पायावर, छातीवर पंजा मारून त्यांना रक्तबंबाळ केले. महाजन यांनी स्वतःच्या बचावासाठी केलेल्या हल्ल्यात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 17/Mar/2025














