◼️ तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा निर्णय
रत्नागिरी : उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाची दाहकता दिवसभर जाणवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सोमवारपासून शाळा सकाळ सत्रात भरवण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांना उन्हामध्ये ये-जा करावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाच्या झळा बसू नयेत. जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळा इमारती या पत्र्याच्या छपराने युक्त आहेत. तसेच प्राथमिक शिक्षण विभागाच्या वार्षिक वेळापत्रकात दि. १५ मार्चनंतर सकाळच्या सत्रात सकाळी ७.२० ते ११.३० या वेळेत शाळा भरवण्यात यावी, अशा सूचना शासनाच्या आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत.
दरवर्षी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार मार्च महिन्यात प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवली जात आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा सकाळी भरवण्यात येत आहेत. -बी. एम. कासार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 17-03-2025














