रत्नागिरी : स्व. रतन टाटा यांनी सीएसआरमधून मंजूर केलेल्या स्कील डेव्हलमेंट सेंटरचे भूमिपूजन, थिबा पॅलेस येथील थ्रीडी मल्टीमिडिया शोचा शुभारंभ, भगवती बंदर येथील शिवसृष्टी टप्पा-2चा शुभारंभ सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
स्वर्गीय रतन टाटा यांनी सीएसआरमधून रत्नागिरी जिल्ह्यासाठी स्कील डेव्हलमेंट सेंटर मंजूर केले होते. रत्नागिरीतील उद्यमनगर चंपक मैदान येथे या सेंटरची उभारणी होणार असून सोमवार दि.17 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता या सेंटरचे भूमिपूजन ना. अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्या नंतर सायंकाळी 8.15 वाजता थिबा पॅलेस येथील थ्रीडी मल्टीमिडिया शोचा शुभारंभ ना. पवार यांच्या हस्ते होईल. त्या नंतर सायंकाळी 9 वाजता भगवती बंदर येथील शिवसृष्टी टप्पा-2 कामाचा ना. पवार यांच्या हस्ते शुभारंभ होईल. याच दिवशी तिथीप्रमाणे शिवजयंती आहे. शिवसेनेच्या वतीने शिवजयंती भव्यदिव्य स्वरूपात जल्लोषात साजरी केली जाणार आहे. यावेळी गृहराज्य मंत्री ना.योगेश कदम, खासदार नारायणराव राणे, खा.सुनिल तटकरे, आमदार किरण सामंत, आ. शेखर निकम उपस्थित राहणार आहेत.
स्कील डेव्हलपमेंट सेंटरच्या भूमिपूजन सोहळ्याला जिल्ह्यातील अभियांत्रिकी क्षेत्रातील सुमारे अडीच हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 17-03-2025














