गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी : शहरातील बेलबाग, चंपक मैदान, मिरजोळे बौद्धवाडी, मुरुगवाडा या ठिकाणी बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या चौघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या चौघांकडून एकूण ३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवार १४ मार्च रोजी दुपारी २.३५ ते रात्री ८.१५ वा. कालावधीत करण्यात आली.

सुधाकर कमलाकर मयेकर (६०, रा. धनजीनाका बेलबाग, रत्नागिरी), शैलेश वसंत आर्ये (२८, रा. उद्यामनगर, रत्नागिरी), संदेश गणपत जाधव (५२, रा. मिरजोळे, रत्नागिरी), नंदकुमार चंद्रकांत मयेकर (५६, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत.

या घटनेतील सुधाकर हा आपल्या ताब्यात २२० रुपयांची ४ लिटर, शैलेश आर्ये हा आपल्या ताब्यात २ हजार रुपयांची ३० लिटर गावठी दारु, संदेश जाधव ५५० रुयांची ५ लिटर दारु तर नंदकुमार मयेकर २५० रुपयांची ५ लिटर दारु विक्रीसाठी ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 17/Mar/2025