खेड : शहरात सन २०२३ मध्ये आलेल्या महापुरात ज्यांचे नुकसान झाले होते, त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गृहराज्य तथा महसूल मंत्री योगेश कदम यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. खेड मध्ये पूर येऊन गेल्या पाच वर्षात अनेक नागरिक व व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. परंतु फक्त ८४ नागरिकांनाच शासकीय नुकसान भरपाई मिळालेली होती व उर्वरित ३५० व्यापारी व नागरिकांना नुकसान भरपाई मिळाली नाही, ती नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी मनसेने गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांना निवेदन देऊन केली आहे. ऋषिकेश कानडे, नंदू साळवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 17/Mar/2025














