चिपळूण : शहरातील शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक मोटार रस्त्याकडील गटारात जाऊन उलटली. सुदैवाने, या गाडीतील विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात शनिवारी दुपारी घडला. गाडीचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे; मात्र उशिरापर्यंत चिपळूण पोलिस ठाण्यात या अपघातप्रकरणी नोंद झालेली नाही.
रस्त्याने जाणारी एक मोटार विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. यावेळी अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याने ही मोटार गटारात उलटली. या गाडीत पाच ते सहा विद्यार्थी होते. सुदैवाने, विद्यार्थ्यांना मोठी दुखापत झाली नाही. काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 17/Mar/2025














