रत्नागिरी : टेम्पोची दुचाकीला धडक; गुन्हा दाखल

रत्नागिरी : अडीज महिन्यांपूर्वी पावस ते रत्नागिरी रस्त्यावर टेम्पोने दुचाकीला धडक देत केलेल्या अपघाताप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना 20 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12.30 वा. सुमारास घडली होती.

याप्रकरणी शार्दुल मंगेश भाटकर (24,रा.पावस भाटीवाडी,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, 20 डिसेंबर रोजी तो आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एजे-4888) घेउन पावस ते रत्नागिरी असा येत होता. तो फणसोप शाळेच्या अलीकडे आला असता पाठीमागून येणार्‍या हिरव्या रंगाच्या छोटा हत्ती टेम्पोने त्याला धडक देत अपघात केला. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालकाने त्याठिकाठी न थांबता टेम्पोसह पळ काढला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 17-03-2025