रत्नागिरी : शिवसेनेचे माजी जिल्हापरिषद अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिवसैनिक जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी आज मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात प्रवेश केला.
कोकणात शिवसेनेची पहिली ग्रामपंचायत आणणारे ज्येष्ठ शिवसैनिक आबा घोसाळे आज आमच्यासोबत येत आहेत याचा आम्हाला आनंद होत आहे. येत्या प्रत्येक आठवड्यात असे अनेक प्रवेश होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. जयसिंग घोसाळे यांच्या या प्रवेशामुळे उबाठा ला जोर का झटका असल्याचे बोलले जातय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:27 05-10-2024