लांजा : बेनी बुद्रुक येथे आंब्याचे वानरांकडून नुकसान

लांजा : तालुक्यातील साटवलीनंतर आता बेनी बुद्रुक गावामध्ये वानरांनी आंबा फळास आपले लक्ष्य केले आहे. आंब्याची तयार होणारी फळे हे तोडून अर्धवट खाऊन वानरांनी नासधूस केली आहे. गवारेड्यांकडूनदेखील पिकांचे नुकसान केले जात असल्याने आंबा बागायतदार व शेतकरी हैराण झाला आहे.

बेनी बुद्रुक कुसुममळेवाडी येथील शेतकरी दीपक परशुराम सुर्वे यांच्या बागेतील आंबा फळांचे वानरांनी मोठे नुकसान केले आहे. तयार होणारी आंबाफळे खाऊन टाकली जात आहेत. त्यामुळे माकडांच्या या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे, तसेच गवारेड्यांकडूनही बागांचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे या वानरांचा तसेच गवारेड्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वनविभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांतून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 17/Mar/2025