रत्नागिरी : आज रत्नागिरी शहरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने शहरातील बाळगोपाळ मंडळींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रंगपंचमीच्या स्वागतासाठी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, आज सकाळपासून या उत्सवाच्या तयारीत व्यस्त आहेत.
रंगपंचमीसाठी लागणाऱ्या रंगांच्या खरेदीसाठी आज सकाळपासूनच बाजारपेठेत दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे, यंदा हर्बल रंग आणि सुक्या रंगांना नागरिकांची पसंती मिळत असून, त्यांची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहे. दुपारनंतर रत्नागिरी शहरात रंगपंचमी खेळण्यास सुरुवात होणार असून, सर्वत्र रंगांची उधळण आणि जल्लोष पाहायला मिळणार आहे.
या उत्सवाचा समारोप सायंकाळी श्री देव भैरीच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर होणार आहे. पालखी मार्गस्थ झाल्यावर रंगपंचमीचा हा रंगीत उत्सव संपन्न होईल. रंगपंचमीच्या या उत्साहात रत्नागिरीकर आज मनसोक्त रंग खेळणार असून, हा सण त्यांच्यासाठी आनंद आणि एकत्रितपणा घेऊन येणारा ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 19-03-2025
