रत्नागिरी : जिल्हा न्यायालय क्रिकेट स्पर्धा | जिल्हा न्यायालयीन संघ विजेता; चिपळूण संघ उपविजेता

रत्नागिरी : जिल्हा न्यायालय रत्नागिरीतर्फे कोळंबे येथील इंटरनॅशनल दर्जाच्या मैदानावर सावंत (सोसा) येथे प्रथमच जिल्हा न्यायालयाच्या स्पर्धा झाल्या.

स्पर्धेतील अंतिम सामना जिल्हा न्यायालय रत्नागिरी विरुद्ध चिपळूण न्यायालय वकील व कर्मचारी संघ यांच्यात अटीतटीचा सामना झाला. जिल्हा न्यायालयीन संघाचा कर्णधार अनुप शिवलकर व धडाकेबाज फलंदाज धीरज चव्हाण यांनी षट्कारांची आतषबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. जिल्हा न्यायालय संघ विजयी, तर चिपळूण संघ उपविजेता ठरला.

या क्रिकेट स्पर्धेला मंडणगड, दापोली, राजापूर, चिपळूण, रत्नागिरी येथील वकिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. क्रिकेट स्पर्धेच्या उद्‍घाटनाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी, मुख्य न्यायदंडाधिकारी एन. जी. गोसावी उपस्थित होते.

स्पर्धेत न्यायालयीन कर्मचारी वकील वर्ग अशा एकूण १० संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये दिवाणी न्यायालय दापोली येथील महिला वकील व कर्मचारी व विरुद्ध रत्नागिरी महिला वकील संघानेही सहभाग घेतला. त्यांच्या सामन्यात रत्नागिरी महिला वकील संघाने विजय मिळवला. स्पर्धेचे नियोजन जिल्हा न्यायालय संघाचे सदस्य, अॅड. सचिन नाचणकर, आर. डी. चाचले आदींनी केले. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज अॅड. पराग सुतार, उत्कृष्ट गोलंदाज- गोरखनाथ शिर्के, सामनावीर व मालिकावीर अनुप शिवलकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- रूपेश गुरव यांनी पारितोषिक पटकावले. बक्षीस समारंभाला जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय चव्हाण, ज्येष्ठ विधीज्ञ महेंद्र मांडवकर, वाय. पी. गुरव, सेवानिवृत्त अधीक्षक के. डी. चव्हाण, अनिकेत कोळी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 20-03-2025