रत्नागिरी : रत्नागिरी जे. के. फाईल्स समोरील महानगर गॅस कडून घरोघरी गॅस लाईन तसेच एम्. आय. डी. सी. रत्नागिरी येथील उद्योजकांना गॅस लाईन देण्यासाठी रस्त्यांची अक्षरशः चाळण केली जात आहे.
रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. वाहनात गॅस भरण्यासाठी वाहने खड्ड्यां मुळे रस्त्यावरच पार्क केली जात असल्याने वयोवृद्ध तसेच दिव्यांगांना चालणे ही कठीण झाले आहे.
एम्. आय. डी. सी. मिरजोळे विश्रांती गृहा समोर असलेल्या साईभूमि नगर गृहसंकुलात तर महानगर गॅस च्या खड्ड्यां मुळे नागरिक हैराण झाले आहेत. खड्ड्यां मुळे दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 20/Mar/2025














