खेड : उपोषणकर्ते भगवान कोकरे यांची प्रकृती खालावली

चिपळूण : गाशोळेला न्याय द्या, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून खेड तालुक्यातील लोटे येथील गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे हे गोशाळेतच उपोषणाला बसले आहेत. गुरुवारी (ता. २०) त्यांची प्रकृती खालावली मात्र तरीही जोपर्यंत शासनाकडून ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार कोकरे यांनी केला आहे.

गोशाळेचे मंजूर २५ लाखांचे अनुदान तत्काळ मिळावे, गोशाळेला व्यावसायिक दराने होणारा वीजपुरवठा शेतीप्रमाणे आकारण्यात यावा, गोशाळेच्या जागेचा प्रश्न शासनाने सोडवावा आदी मागण्यांसाठी कोकरे उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे गोशाळेला शासनाकडून ३३ लाख ४८ हजार रुपये मिळाले आहेत, मात्र अन्य मागण्यांसाठी त्यांनी उपोषण कायम ठेवले. गुरुवारी त्यांची प्रकृती खालावली. यामुळे लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी त्यांची सातत्याने आरोग्य तपासणी करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 21/Mar/2025