मांदिवलीतील मायनिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा ठाम विरोध

दापोली : मांदिवली गावात होणाऱ्या प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा सुरुवातीपासूनच ठाम विरोध आहे. ज्या प्रकल्पामुळे पर्यावरणाच्या हानी होणार आहे, असा प्रकल्प गावात नको, असा निर्धार येथील ग्रामस्थांनी केला आहे.

प्रकल्पा बाबतच्या जनसुनावणीत विरोधात आपले मत मांदिवली ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या गावातील लोकांनी मांडली होती. प्रकल्प विरोधात लोकांची आक्रमकता पाहता अध्यक्षानी जनसुनावणी रद्द केली होती. मात्र, तरीही प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी देऊन पर्यावरणाचा हास करणारा प्रकल्प लोकांच्या माथी मारला जात आह, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. दि. १५ मार्च रोजी कुणबी सेवा संघ ११ गाव कमिटीने बैठकीचे आयोजन करून मायनिंग विरोधात एक मताने ठराव मंजूर केला आहे.

कुणबी सेवा संघ ११ गाव कमिटी दापोली उत्तर विभागात मांदिवली येथील सावंतवाडी, बाईतवाडी, अनंतवाडी, बांझळोली, गावठणवाडी, हनुमानवाडी, आमखोलवाडी, रावतोली, गाववाडी, कोंडवाडी, कवडोली, गाववाडी, खरावते, उंबरशेत या गावातील वाड्यांचा समावेश होता. पर्यावरण मंजुरी रद्द करण्यासाठी लवकरच ग्रामस्थ योग्य ती पावले उचलणार आहेत असा ठराव या वेळी ग्रामस्थानी
केला आहे.

रोवले आणि उंबरशेत येथील अनधिकृत बॉक्साइट उत्खनन प्रकल्पाच्या वाहतुकीमुळे ही गावे आधीच त्रस्त आहेत. प्रकल्पासाठी झाडांची कत्तल केली जात आहे. मांदिवली उर्दू शाळा प्रकल्प हद्दी पासून फक्त ९५ मीटर वर आहेत, तर आमखोल शाळा १५० मीटरवर. वाडीवसत्या ३०० मीटरच्या आत आहेत तरीही या प्रकल्पाला मंजुरी देऊन प्रशासन लोकांच्या जीवाशी खेळत आहे. या बाबत मंत्री मोहोदय याना देखील निवेदन देण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:43 PM 21/Mar/2025