देवळे-मुंबई एसटी पुन्हा सुरू

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील देवळे-मुंबई ही गाडी चालू व्हावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. त्याचा त्वरित विचार करून ही गाडी पुन्हा सुरू केली आहे. अपूर्वा सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून एसटी रवाना झाली.

गेली कित्येक वर्षे ही गाडी बंद होती. शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास बेर्डे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रसाद अपंडकर, युवा सेना विभागप्रमुख अंकुश सुर्वे, तालुका महिला संघटक रेश्मा परशेटे, विभागप्रमुख राजेश कामेरकर, हातखंबा उपविभागप्रमुख गौरव संसारे यांनी पाठपुरावा करून ही गाडी सुरू व्हावी म्हणून प्रयत्न केले. देवळे-मुंबई गाडी सुरू करण्यासाठी देवरूख आगारप्रमुख कैलास साबळे, साखरपा नियंत्रक गणेश वायदंडे यांचेही सहकार्य लाभले.

ही एसटी स्लीपर कोच असून पाली, नाणीज, करंजारी, घाटीवळे, जंगलवाडी, देवळे, दाभोळे, साखरपा, देवरूखमार्गे धावणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:24 22-03-2025