उद्योगिनींना स्टॉल बुक करण्याची संधी
रत्नागिरी : रोटरी क्लब रत्नागिरीच्या वतीने १८ ते २० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळात वुमेन्स शॉपिंग फेस्ट चे आयोजन जयेश मंगल कार्यालय, थिबा प्यालेस रोड, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. दिवाळीच्या तोंडावर आयोजित करण्यात आलेल्या या वुमेन्स शॉपिंग फेस्टला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. या माध्यमातून गृहिणींना आपल्या उदोगधांद्यासाठी चालना देता येणार आहे. सध्या या फेस्ट मधील हॉल १ मधील सर्व स्टॉल बुक झाले असून, हॉल दोन मधील फूड स्टॉल उपलब्ध आहेत. यासाठी कुणाला बुकिंग करावयाचे असल्यास रोटे.वेदा मुकादम मो.९९२३९९३१९९, रोटे. प्रमोद कुलकर्णी मो.९८२०००७३९८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
१८ ते २० ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळात आयोजित करण्यात आलेल्या या वुमेन्स शॉपिंग फेस्ट मध्ये साडी आणि ड्रेसेस, लहान मुलांचे ड्रेसेस, सिल्वर आणि इमिटेशन ज्युलेअरी, बॅग्स आणि पर्सेस, फूड्स, इनडोअर आऊटडोअर झाडे, आर्ट गॅलरी, हॅंडमेड कारपेट, आणि आणि बरेच काही तसेच दिवाळी साठी खास ऑफर देखील असणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 07/Oct/2024
