खेड : कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेकडून निवेदन

खेड : शिवसेनेचे मुख्य नेते, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या विरोधात कुणाल कामरा या कॉमेडीयन व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना खेड तालुक्याच्या वतीने खेड पोलिस स्टेशन येथे निवेदन देऊन करण्यात आली.

यावेळी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना निवेदन देण्यात आले. शिवसैनिकांनी कामरा याचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी तालुका प्रमुख सचिन धाडवे, युवा सेना तालुका अध्यक्ष मिलिंद काते, शहर प्रमुख कुंदन सातपुते, शिवसेना पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारी व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 27/Mar/2025