खेडमध्ये आणखी ३८ थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा

खेड : खेड नगर परिषदेच्या पाणी विभागाच्या पथकाने थकित पाणीपट्टीधारकांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. २ दिवसात ३८ थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्या. आतापर्यंत पाणीपुरवठा खंडित करण्यात आलेल्या थकबाकीतदारांची संख्या ४३ वर पोहचली आहे. यातील काही थकितदारांनी पाणीपट्टीची रक्कम भरणा करत नगर प्रशासनाला सहकार्य केल्याचे सांगण्यात आले.

मुख्याधिकारी महादेव रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेतील पाणीपुरवठा विभागातील उमेश रेपाळ, पाणीपुरवठा अभियंता अक्षय लोहार, प्रणील जाधव, राजेश खेडेकर, मुकेश पेवेकर, सुनील पिलदणकर, सुयोग शिर्के, निखिल यादव आदींच्या पथकांमार्फत थकितदारांच्या नळजोडण्या तोडण्याची मोहीम गतीमान केली आहे. आठवडाभरापासून पुन्हा ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नगर प्रशासनानेही सुट्टीच्या दिवशी ३१ मार्चपर्यंत कराची रक्कम स्वीकारण्यासाठी वसुली कक्ष खुला ठेवला आहे. थकित पाणीपट्टीधारकांनी कराची रक्कम भरणा करून नगर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 27/Mar/2025