दापोली : रहदारीस अडथळा करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील केळसकर नाका येथे रहदारीच्या रस्त्यावर इतर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा रितीने गाडी उभी करणाऱ्या चालकाविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार २६ मार्च रोजी रात्री ९.२० वा. सुमारास करण्यात आली.

साई विवेक कदम (२५, रा. दापोली, काळकाई कोंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गाडी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार संतोष सडकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार बुधवारी त्याने सार्वजनिक रस्त्यावर इतर वाहनांना अडथळा निर्माण होईल, तसेच पादचाऱ्यांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गाडी उभी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 28/Mar/2025