रत्नागिरी जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १७ वयोगटासाठी राज गमरे याची उकृष्ट गोलंदाज म्हणून निवड

चिपळूण : तालुक्यातील बामणोली बौध्दवाडी येथील जयभीम क्रिकेट क्लबचे सदस्य प्रमोद गमरे यांचा सुपुत्र राज गमरे याची रत्नागिरी जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन २०२५ यांच्या माध्यमातुन अंडर १७ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी उकृष्ट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे.

गुहागर येथे झालेल्या खेळाडू निवड चाचणीमध्ये जिल्ह्यातील अंडर १७ स्पर्धेसाठी खेळाडूची निवड चाचणी पार पडली. यामध्ये उत्कृष्ठ ५० खेळाडूंमधून अंतिम १५ मध्ये उत्कृष्ठ गोलंदाज क्रमांक २ साठी राज गमरे याची निवड झाली. राज हा बामणोली येथील जयभीम क्रिकेट क्लबचा नवी आशा घेऊन येणारा उभरता क्रिकेटपटू आहे. त्यांनी मुंबई आणि ग्रामीण भागातील स्पर्धेतून उत्तम कामगिरी केली आहे.

त्याच्या अप्रतिम खेळाची दखल घेत त्याची अंडर १७ मध्ये गोलंदाज म्हणून निवड झाली आहे. ही बाब बामणोली गावासाठी निश्चितच अभिमानाची आहे. राजचे सर्वांनी अभिनंदन केले आहे. त्याला मिळालेल्या संधीच त्याने सोन करावे अशी सदिच्छा सर्वांनी व्यक्त केली आहे. त्याच्या निवडी बद्दल कुणबी युवा चिपळूण, मुंबई क्रिकेट मंडळ बामणोली, ग्रामविकास मंडळ बामणोली, जयभीम क्रिकेट क्लब आणि सर्व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 28-03-2025