मंडणगड : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाण्याच्या माध्यमातून आक्षेपार्ह शब्द वापरून बदनामी करणाऱ्या स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीसाठी २८ मार्च २०२५ रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, शहरप्रमुख विनोद जाधव यांच्या उपस्थितीत मंडणगड पोलीस ठाणे येथे पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात शिवसैनिकांचे स्फूर्तीस्थान, शिवसेना नेते व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कुणाल कामरा यांनी केलेली बदनामी आम्ही शिवसैनीक खपवून घेणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याचबरोबर कामरा यांनी गाण्याचे माध्यमातून केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत असून, त्याच्या विरोधात रितसर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनावर तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर यांची सही असून, निवेदनाची प्रत तहसीलदार मंडणगड यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. यावेळी चेतन सातोपे, योगेश जाधव, नीलेश गोवळे, प्रवीण जाधव, दीपक मालुसरे, संजय शेडगे, विकास पवार, अक्षय भगत, आनंद भाटे, अस्मिता केंद्रे, योगेश जर्गम, प्रतिक पोतनीस, सेजल गोवळे, वैशाली रेगे, संदीप येलवे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 28/Mar/2025













