कोकण रेल्वे मार्गावर २८ ते ३१ मार्चपर्यंत ‘मेगा ब्लॉक’

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील पदुबिद्री स्टेशनवरील पॉइंट क्रमांक १०३ आणि ११६ बदलण्यासाठी एनआय मेगा ब्लॉक चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी २८ ते सोमवारी ३१ मार्च असा हा चार दिवसाचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

शुक्रवारी गाडी क्रमांक १०१०७ मडगाव जंक्शन ते मंगळुरू सेंट्रल मेमू एक्सप्रेस मडगाव जंक्शन ते इन्नाजे सेक्शन दरम्यान ५० मिनिटांसाठी नियमित केली जाईल. गाडी क्रमांक २०६४६ मंगळुरू सेंट्रल ते मडगाव जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस ठोकूर ते नंदीकूर विभागा दरम्यान २० मिनिटांसाठी नियमित केली जाईल. तसेच शनिवारी २९ मार्च रोजी गाडी क्रमांक १०१०७मडगाव जंक्शन ते मंगळुरू सेंट्रल मेमू एक्सप्रेस मडगाव जंक्शन ते इन्नाजे सेक्शन दरम्यान ५० मिनिटांसाठी नियमित केली जाईल. गाडी क्रमांक १०१०७ मडगाव जंक्शन ते मंगळुरू सेंट्रल मेमू एक्सप्रेस मडगाव जंक्शन ते इन्नाजे सेक्शन दरम्यान ५० मिनिटांसाठी नियमित केली जाईल.

गाडी क्रमांक २०६४६ मंगळुरू सेंट्रल ते मडगाव जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस ठोकुर ते नंदीकूर सेक्शन दरम्यान २० मिनिटांसाठी नियमित केली जाईल. तसेच रविवारी ३० मार्च रोजी गाडी क्रमांक २०६४६ मंगळुरू सेंट्रल ते मडगाव जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस ठोकुर ते नंदीकूर सेक्शन दरम्यान २० मिनिटांसाठी नियमित केली जाईल. येत्या सोमवारी ३१ मार्च रोजी गाडी क्रमांक १०१०७ मडगाव जंक्शन ते मंगळुरू सेंट्रल मेमू एक्सप्रेस मडगाव जंक्शन ते इन्नाजे सेक्शन दरम्यान ५० मिनिटांसाठी नियमित केली जाईल. गाडी क्रमांक २०६४६ मंगळुरू सेंट्रल ते मडगाव जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस ठोकुर ते नंदीकूर सेक्शन दरम्यान २० मिनिटांसाठी नियमित केली जाईल. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी अशी विनंती कोकण रेल्वेने केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 28/Mar/2025