औद्योगिक प्रशिक्षण विकास राज्यस्तरीय शिबिर समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त : मकरंद ढोकळे

खेड : औद्योगिक प्रशिक्षण विकास महामंडळाचे राज्यस्तरीय शिबिर २३ रोजी पुणे येथे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे डॉक्टर आंबेडकर मेमोरियल आयटीआय येथे झाले. औद्योगिक प्रशिक्षण विकास महामंडळाचे पहिले राज्यस्तरीय शिबिर होते. त्यामध्ये खासगी आयटीआय चालवणाऱ्यांचे न्याय हक्क, जवाबदारी व कर्तव्य या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले असून आगामी काळात त्यामुळे अनेक समस्या सोडवण्यासाठी संघटित प्रयत्न करता येतील, अशी माहिती महामंडळाचे कोकण विभाग अध्यक्ष मकरंद ढोकळे यांनी दिली.

पुणे येथे औद्योगिक प्रशिक्षण विकास महामंडळाच्या झालेल्या पहिल्याच शिबिराची माहिती ढोकळे यांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले, हे शिबिर महामंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या शिबिरासाठी कोकण विभागातून संदीप नगरकर, मुंबई विभागातून, जिल्हाध्यक्ष सुनील करंडे, सर्व तालुकाप्रमुख प्रशांत राजेशिर्के, नितीन रानसे, प्रा. मनोज भागवत, तस्लिम भुरे, सरफराज, मुद्दसीर, प्रा. सुधीर माने, प्रवीण शिने, सुमित मोरे आदी उपस्थित होते.

या शिबिरात प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून लायन्स क्लब पुणे अध्यक्ष अशोक येवले, अॅड. एस बी चांडक, मिटकॉन चे संचालक डॉ. गणेश खामगळ, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ अध्यक्ष अॅड. किशोर ढोकळे, मानवाधिकार संघटना पुणे च्या मोहिनी जगताप, छत्रपती संभाजी नगर येथील संजय जगताप आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 29/Mar/2025