दापोली : हर्णे येथे उद्या हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन

दापोली : हणें-पाळंदे एकता विचार मंचतर्फे हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त ३० मार्च रोजी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ४:३० वाजता हर्णे येथील मिलिंद बारटक्के यांच्या दुकानापासून ते कमलेश्वर मंदिर गुरववाडीपर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणाऱ्यांचा सन्मान होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 29/Mar/2025