दापोली : नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या नवोदय विद्यालयासाठी दापोलीतून ८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराय यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची झालेली निवड ही व्हीजन दापोलीचा इम्पॅक्ट असून स्थानिक मुलांना संधी मिळत असल्याबाबत गटशिक्षणाधिकारी बळवंतराव यांनी समाधान व्यक्त केले. यामध्ये मिहीर घाणेकर, देगाव, अनुज जागडे, शिर्दे ऋग्वेद गुरव, ओळवण, समृद्धी रूके कर्दे, विनीत राणे, विरसई, प्राप्त जाधव बोरथळ, मोक्षता चोगले पाजपंढरी, आणनवसे नं १ शाळेची विधी ओनकर यांची निवड झाली आहे. या यशाबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:52 PM 01/Apr/2025
