खेड : खेड तालुक्यातील नातुगर, गावडेवाडी येथील रहिवासी रामकृष्ण काशिराम गावडे (वय ५३ वर्षे) यांचे मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२.१२ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याची नोंद दि. ०३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी १९.२४ वाजता खेड पोलिस ठाण्यात आम्रु. क्रमांक ३४/२०२५ अंतर्गत बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.
रामकृष्ण गावडे हे आपल्या राहत्या गावी झाडावर चढून फांद्या तोडत असताना अचानक त्यांचा तोल गेला. यामुळे ते दुसऱ्या झाडावर पडले आणि त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी वालावलकर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांना वॉर्ड २० ए मध्ये दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू झाले. परंतु, सर्व प्रयत्नांना अपयश आले आणि उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 04-04-2025













