खेड : जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. एककिडे गाळ उपसण्याच्या प्रक्रियेत मगरीचा अडसर उभा ठाकत असतानाच दुसरीकडे दुपारच्या सुमारास भरती-ओहाटीमुळे गाळ उपसा प्रक्रियेत खोडा पडत आहे. कार्यरत यंत्रणांना दुपारच्या सुमारास काहीकाळ विश्रांती घ्यावी लागत आहे.
जगबुडी नदीपात्रात साचलेला गाळ उपसण्यासाठी २ पोकलेन मशीन तैनात करण्यात आल्या आहेत. उपसलेला गाळ अन्यत्र वाहून नेण्यासाठी डम्परही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय शेतकऱ्यांनाही स्वखचनि गाळ वाहून नेण्याची मुभा देण्यात आली आहे.
आतापर्यंत ३ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असला तरी दुपारच्या सुमारास भरती-ओहोटीमुळे गाळ उपसण्याच्या प्रकियेला ‘ब्रेक’ लावावा लागत आहे. याचमुळे २६ दिवसात अवधा ३ हजार घनमीटर गाळ उपसण्यात यश आले आहे.
पाऊस पडेपर्यंत जगबुडी नदीपात्रातून गाळ उपसण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लवकरच नाम फाऊंडेशन देखील गाळ उपसा प्रक्रियेत सामील होणार आहे. यामुळे दुपटीने गाळ उपसा होणार असला तरी दुपारच्या सुमारास भरती-ओहोटीमुळे दोन्ही यंत्रणांना काहीकाळ प्रक्रिया थांबवावी लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 01/Apr/2025
