रत्नागिरी : जिल्हा नियोजनसाठी मंजूर झालेला शंभर टक्के निधी खर्च

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ चा मंजूर अर्थसंकल्पीय नियतव्यय ३६० कोटी मार्च अखेर १०० टक्के खर्च केला आहे. अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, क्षेत्राबाहेरील योजना यांवर १०० टक्के निधी खर्चा पडला आहे. जिल्हा परिषदेला १९८.८८ कोटी, राज्यस्तरीय योजनांना ११२.०६ कोटी, नगरपालिकांना ४९.०६ कोटी असा निधी वितरित करण्यात आला आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२४-२५ साठी मंजूर अर्थसंकल्पीय नियतव्यय ३६० कोटी होता. त्यापैकी आतापर्यंत दिलेली प्रशासकीय मंजूरी ही ३६९.८४ कोटीची होती. वितरीत केलेला निधी ३६० असून खर्च झालेला निधी ३६० कोटी एवढा आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांमध्ये जिल्हा प्रशासनाने जिल्हा नियोजनचा १०० टक्के निधी खर्च केला आहे. यामध्ये अनुसूचित जाती उपयोजना २०२४-२५ चा मार्च २०२५ अखेर झालेला खर्च आर्थिक वर्षामध्ये २९ कोटी मंजूर होता.

तसेच पूर्ण निधी प्रत्यक्ष प्राप्त झालेला असून पूर्ण निधी संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला आहे. त्याची टक्केवारी १०० टक्के आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील उपयोजना २०२४-२५ माहे मार्च २०२५ अखेर झालेला खर्च या आर्थिक वर्षामध्ये १ कोटी १२ लाख ४६ हजार मंजूर होता. तसेच पूर्ण निधी प्रत्यक्ष प्राप्त झालेला असून १ कोटी १२ लाख ४६ हजार निधी संबंधित कार्यालयीन यंत्रणांना वितरित करण्यात आलेला आहे. हा निधी देखील १०० टक्के खर्च झाला आहे.

जिल्हा नियोजन विभागाचा निधी अखेरच्या टप्प्यात १०० टक्के खर्च केला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेला सर्वांत जास्त म्हणजे १९८.८८ कोटी म्हणजे ५५.२४ टक्के, राज्यस्तरीय योजनांना ११२.०६ कोटी म्हणजे ३१.१३ टक्के तर नगरपालिकांना ४९.०६ कोटी म्हणजे १३.६३ टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ साठी मंजूर अर्थसंकल्पीय नियतव्यय ३६० कोटी एवढा १०० टक्के खर्च झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 04/Apr/2025