रत्नागिरी : Unseasonal Rain : रत्नागिरी जिल्ह्यावर चक्रीवादळासारख्या वाऱ्याची निर्मिती झाली आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांसाठी कोकणात अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा यलो अलर्ट जारी केला आहे. सध्या कोकणात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.
एका तासाच्या पावसामुळे तयार झालेले आंबे गळून पडले आहेत. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे आंब्यावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. तसेच मे महिन्यात तयार होणाऱ्या लहान कैऱ्यांचेही नुकसान झाले आहे.
रत्नागिरीतील राजपूर परिसरालाही अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. राजापूर तालुक्यात आज पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यामुळे कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या देखील पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 03-04-2025














