Ram Navami 2025 Date : 6 की 7 एप्रिल? यंदा राम नवमी नेमकी कधी..

Ram Navami 2025 Date : हिंदू धर्मग्रंथात राम नवमीच्या (Ram Navami) सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. त्यानुसार, दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला राम नवमीचा उत्सव साजरा केला जातो.

पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्री रामाचा जन्म झाला होता असं म्हणतात. म्हणूनच हा दिवस भगवान रामाच्या जयंतीचा उत्सव म्हणून देशभरात साजरा केला जातो. या दिवशी भगवान रामासाठी भक्त उपवास ठेवतात त्यांची मनोभावे पूजा करतात.

राम नवमी तिथी (Ram Navami Tithi 2025)

वैदिक पंचांगानुसार, यंदा चैत्र शुक्ल नवमी तिथीची सुरुवाक 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजून 26 मिनिटांनी होणार आहे. तर, या तिथीची समाप्ती 6 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी होणार आहे. उदय तिथीनुसार, 6 एप्रिल 2025 रोजी राम नवमीचा उत्साह संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे.

राम नवमीचा शुभ मुहूर्त (Ram Navami Shubh Muhurta 2025)

6 एप्रिल 2025 रोजी राम नवमीच्या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 08 मिनिटांनी सुरु होणार आहे. हा मुहूर्त दुपारी 01 वाजून 39 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दरम्यान तुम्ही भगवान रामाची पूजा करु शकता.

राम नवमीचा शुभ योग (Ram Navami Shubh Yog 2025)

पंचांगानुसार, राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर पुष्य नक्षत्राचा योग जुळून येणार आहे. या व्यतिरिक्त या दिवशी सुकर्मा योग देखील जुळून आला आहे. हा योग संध्याकाळी 06 वाजून 54 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानंतर धृति योग बनणार आहे.

राम नवमी पूजा विधी (Ram Navami Puja and Vidhi 2025)

  • राम नवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा करण्यासाठी पहाटे लवकर उठून स्नान करा.
  • तसेच, पूजाघरात भगवान श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण तसेच, भगवान हनुमानाची मूर्ती स्थापित करा.
  • आता भगवान रामाला चंदन लावून त्यांना फूल, अक्षता आणि धूप अर्पण करा.
  • त्यानंतर शुद्ध देशी तुपात दिवा लावून देवाला मिठाई आणि फळांचा नैवेदय अर्पण करा.
  • तुम्ही श्रीरामचरितमानस, संदरकांड किंवा रामरक्षा स्त्रोताचं पठण करा.
  • या दरम्यान भगवान रामाच्या मंत्रांचा देखील जप करा. यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
  • त्यानंतर भगवान रामाची पूजा करुन, नैवेदय अर्पण करा आणि प्रसादाचं वाटप करा.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 04-04-2025