रत्नागिरी : पानवल येथे रविवारी रामनवमी उत्सवाचे आयोजन

रत्नागिरी : तालुक्यातील पानवल-शिंदेवाडी येथे रविवार, दि. ६ एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ६ रोजी पूजा, भजन, जन्मोत्सव, महाआरती, महाप्रसाद, प्रभूची मिरवणूक, नमन तर दि. ७ रोजी श्री सत्यनारायण महापूजा, भजन, महाप्रसाद, लकी ड्रॉ सोडत, स्थानिक कार्यक्रम होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:49 PM 04/Apr/2025