धरणांवर करोडोंचा खर्च, मात्र पाण्यासाठी वणवण..

राजापूर : दिवसागणिक कडाक्याचा उन्हाळा जाणवत असतानाच दुसरीकडे भूजल पातळी देखील कमी होत आहे. परिणामी, पुढील काही महिन्यांत उग्र पाणीटंचाई जाणवेल, अशी शक्यता आहे. त्या दृष्टीने पाण्याचे नियोजन सुरु असतानाच दुसरीकडे मात्र शासनाने धरण प्रकल्पांवर करोडो रुपये खर्च केले आहेत. तरी देखील पाण्यासाठीची वणवण काही संपलेली नाही, असेच चित्र आहे. अनेक ठिकाणी चरण प्रकल्प उभे करण्यात येउन देखील पाण्यावाचत विदारक चित्र पहावयास मिळत आहे. राजापूर तालुक्यावर एक कटाक्ष टाकल्यास असे आढळून येईल की, या तालुक्यात अनेक धरण प्रकल्प आले. त्यातील काही बांधून पूर्ण झाले. तर काही अद्याप निधीअभागी रखडले आहेत. पण, शासनाचा हेतू काही सफल झालेला नाही, असेच वास्तव आहे.

धरणे बांधून पूर्ण आहेत. त्यामध्ये तुटुंब पाणीसाठा आहे. मात्र कालव्यांचा पत्ताच नसल्याने तालुक्यातील भातशेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी एक टिपूसभर देखील पाणी जनतेला मिळत नाही तर दुसरीकडे काही धरणे अपूर्णावस्थेत आहेत. परिणामी, तालुक्यातील जनतेला दरवर्षी उग्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र राजापूर तालुक्याचे आहे मागील काही वर्षे तालुक्याची अशीच स्थीती आहे.

शासनाने गेल्या काही वर्षात या परिसरात काही धरणे बांधली. त्यामध्ये अर्जुना नदीवर अर्जुना खोरे प्रकल्प, पाचल दिवाळवाडी, तळबड़े, परुळे, ओझर, ताम्हाने, बाळबाड, केळवली, कळसवली, बाटुळ कानिर्धा, जामदा प्रकल्प, जुबाटी, कोंडघे, पांगरे, चिखलगाव यांचा समावेश आहे. या सर्व धरणांवर करोडो रुपये खर्च झाले आहेत. मात्र एवढा खर्च होऊन देखील समस्त जनतेला पाणी मिळालेले नाही हेच सत्य अधोरेखित ठरले आहे. तालुक्यात अर्जुना व जामदा असे दोन मध्यम प्रकल्प आहेत, त्यापैकी अर्जुना पूर्ण आहे तर त्या प्रकल्पातून बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरु आहे. तर गेले सहा, सात वर्षे रखडलेल्या जामदा प्रकल्पाचे काम मागील वर्षी सुरु झाले होते; मात्र यावर्षी ते सुरू झालेले नाही.

तालुक्यात पाचल दिवाळवाडीसह ओइर तळवडे, पाचल येथील धरणे बांधून अनेक वर्षे झाली मात्र एवढ्या वर्षात त्या धरणातून कालवेच काढण्यात न आल्याने धरणातील तुटुंब साचलेला पाणीसाठा कायम राहतो. दरवर्षी उन्हाळ्यात अर्जुना नदीत पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीत पाणीसाठा असतो याव्यतिरिक्त धरणाच्या पाण्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. धरणक्षेत्रातील सिंचनात वाढ झालेली दिसत नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पाहिजे तेक्हा सुटलेला नाही. तो अद्यापही जटिलचा आहे. ज्या गावात धरणे बांधली गेली आहेत नेमका तो परिसर दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करताना दिसतो नेमकी हीच धरण क्षेत्रातील गावे गेल्या काही वर्षात जलयुक्त शिवार या योजनेतही सामाविष्ट केलेली आहेत. तरीही पाणीटंचाई काही दूर झालेली नाही, हेच आजचे चित्र आहे.

तालुकावासीयांना भातशेतीसह पिण्याच्या पाण्याची भेडसावणारी पाणीटंचाई दूर व्हावी गाउद्देश्याने शासनाने धरणे बांधली मात्र आज एकूणच या धरणांची स्थिती पाहता शासनाच्या मूळ उद्देशालाच तडा गेलाय का? अशी धरणांची अवस्था बनली आहे. याबाबत शासनाने अपूर्ण धरणे बांधून पूर्ण करावीत व सर्व धरणांतून समस्त शेतकरी बांधवांसह जनतेला मुबलक स्वरुपात कसे पाणी मिळेल, त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 04/Apr/2025