चिपळूण : खेड तालुक्यातील धामणदेवी गावच्या सरपंचांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता. याबाबत तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत सरपंचांनी कर्तव्यात कसूर केल्याची बाब समोर आली. त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील ३९ (१) नुसार अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, असा अहवाल खेड पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.
धामणदिवी घडशीवाडी येथील संदीप श्रीपत गोवळकर यांनी १९ डिसेंबर २०२४ रोजी सरपंचाविरोधात तक्रार अर्ज खेड पंचायत समितीकडे दिला होता. त्यानुसार विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी करून गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल दिला. त्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोणता निर्णय घेतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 05/Apr/2025














