मंडणगड : उन्हाच्या लाही लाहीने नागरिक त्रस्त असताना गुरुवारी ( दि. 3 एप्रिल) रोजी सायंकाळी ढग दाटून येऊन पावसाचे वातावरण तयार झाल्याने व अंधार पडता पडता एक तास धुंवाधार पाऊस बरसल्याने उन्हाच्या लाहीने त्रस्त झालेले मंडणगड मधील नागरिकांना काही अंशी का होईना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
दि.3 एप्रिल रोजी तापलेल्या उन्हाने उष्णतेने उकाडा वाढला होता, सायंकाळच्या सुमारास वातावरणात ढग दाटून येवून अचानक बदल झाले. व रात्र होता होता विजांचा लखलखाट करीत पावसाने अर्धा तासाकरीता धुंवाधार बॅटिंग केली. त्यामुळे रस्ते भिजून गेले व घरांच्या पागोळ्या वाहून गेल्या. मात्र हापूस आंबा तयार होत असताना तालुक्यात पावसाने अचानक लावलेली हजेरी यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. आंबा, काजू बागायतदार यांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 05-04-2025














