रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना २५ कोटी ५९ लाखांचा निधी

रत्नागिरी : केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना २०२४-२५ या आर्थिक वर्षांतील बंधित निधीच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ८३५ ग्रामपंचायतींना २५ कोटी ५९ लाख ३१ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेतून लोकसंख्या आणि क्षेत्रफळानुसार त्या-त्या ग्रामपंचायतींना हा निधी वर्ग करण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून १५ व्या वित्त आयोगातून बंधित आणि अबंधित अशा दोन प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जातो. यात ग्रामपंचायतींना ८० टक्के, तर जिल्हा परिषद आणि पंचायत संमित्यांना १०-१० टक्के निधी वाटपाचे सूत्र ठेवण्यात आले.

आहे. ८३५ ग्रामपंचायतींना निधी ५० टक्के खर्च झाल्यानंतर उर्वरित निधी मिळणार आहे. हा निधी स्वच्छता आणि हागणदारीमुक्त ग्रामपंचायतीची स्थिती कायम राखणे, तसेच देखभाल, दुरुस्तीवर खर्च करता येणार आहे.

पेयजल पाणीपुरवठा, जलपुनर्भरण, रेन हार्वेस्टिंग, जल पुनः प्रक्रियेवर (वॉटर रिसायकलिंग) हा निधी खर्च करण्याच बंधन ठेवण्यात आले आहे. ५० टक्के निधी खर्च झाल्यानंतरच केंद्रीय वित्त आयोगाकडून पुढील हप्त्याचे वितरण केले जाते.

वित्त आयोगातून प्राप्त झालेला निधी

मंडणगड – १ कोटी ८ लाख ९ हजार
दापोली- २ कोटी, ८७ लाख ८० हजार
खेड-२ कोटी ९८ लाख ३६ हजार
चिपळूण – ४ कोटी १२ लाख ३६ हजार
गुहागर – २ कोटी १५ लाख ७६ हजार
संगमेश्वर-३ कोटी ४१ लाख १४ हजार
रत्नागिरी – ४ कोटी ४५ लाख २५ हजार
लांजा – १ कोटी ६३ लाख ६९ हजार
राजापूर – २ कोटी ८६ लाख ८६ हजार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 07/Apr/2025