राजापुरातील रेल्वे आरक्षण सुविधा बंद; प्रवाशांची गैरसोय

राजापूर : कोकण रेल्वेच्या वाणिज्य वेभागाने राजापूर पोस्ट कार्यालयातील आर एस सेवा बंद केल्यानंतर समस्त तालुकावासीय रेल्वे प्रवाशांची आरक्षणबाबत होत असलेली गैरसोय प्रद्यापही कायम असून तीव्र संताप यक्त केला जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर, लांजा, राजापूर आणि लगतच्या गोवा राज्यामध्ये कानकोन येथे पोस्ट कार्यालयात कोकण रेल्वेची पी. आर. एस. (रेल्वे आरक्षण सुविधा सेवा) कार्यरत होती. मात्र, प्रतिदिन अपेक्षित व्यवहार होत नसल्याच्या कारणास्तव कोकण रेल्वेच्या वाणिज्य विभागाने या बारही पोस्ट कार्यालयात सुरू नसलेली पी. आर. एस. सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसा पत्रव्यवहार संबंधित पोस्ट कार्यालयांना पाठवण्यात आला होता. त्यानंतर पी. आर. एस. सेवेची मशीनरी देखील काढून नेण्यात आली होती.

राजापूर पोस्ट कार्यालयातील पी. आर. एस. सेवा आता कायमची बंद झाली असून कोकण रेल्वे प्रशासनाकडून राजापूर तालुकावासियांवर पुन्हा एकदा घोर अन्याय झाला आहे.

विस्ताराने मोठ्या असलेल्या राजापूर तालुक्यासाठी राजापूर रोड हे एकमेव परिपूर्ण स्थानक असून राजापूर शहरापासून ते १५ किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुलभ आरक्षण मिळावे, या उद्देशाने पोस्ट कार्यालयामध्ये पी आर एस (रेल्वे आरक्षण सेवा केंद्र) सुरू करण्यात आली होती.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर आणि लांजा येथे मागील काही वर्षे ती कार्यान्वित होती. तर दीड वर्षांपूर्वी राजापूर पोस्ट कार्यालयात ती सुरू करण्यात आली होती. राजापूरमध्ये या सुविधेचा रेल्वे प्रवासी चांगल्या पद्धतीने लाभ घेत होते. मात्र, कोकण वाणिज्य अचानक रेल्वेच्या विभागाने पोस्ट कार्यालयातील पी आर एस सेवाच बंद करून तालुकावासीयांवर मोठा अन्याय केला आहे.
मागील काही दिवस ही सेवाच बंद असल्याने रेल्वे प्रवाशांना आरक्षण सेवेचा लाभ मिळत नसून तत्काळसह अन्य तिकिटे मिळविताना खूप अडचणी येत आहेत. परिणामी, जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 10/Apr/2025