चिपळूण : रत्नागिरी जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांनी दि. १३ एप्रिल रोजी १३ वर्षाखालील वयोगटातील मुलींसाठी व मुलांसाठी फुटबॉल निवड चाचणीचे आयोजन केले आहे. ही निवड चाचणी सेंट थॉमस हायस्कूल कारवांची वाडी, रत्नागिरी येथे सकाळी ८ ते १० या वेळेत होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील फुटबॉल खेळणाऱ्या १३ वर्षाखालील मुलींनी व मुलांनी यावेळी उपस्थित रहायचं आहे. निवडण्यात आलेला १३ वर्षा खालील मुलींचा व मुलांचा फुटबॉल संघ येत्या काळात दरम्यान वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित १३ वर्षांखालील मुली व मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे.
खेळाडूचा जन्म २०१२ व २०१३ साली झालेला असणे बंधनकारक आहे. येताना सोबत ओरिजनल आधारकार्ड, जन्म दाखला ओरिजनल आणि फोटो घेऊन यावे. अधिक माहितीसाठी प्रसाद परांजपे ९९२०६७४३०६, नित्येय वाघदरे- ९०९६४५९३३३, देवेंद्र साळवी- ७२७६१८५९९९, विनोद म्हस्के ९४२२४४२६२२ यांच्याशी संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 11/Apr/2025














