रत्नागिरी : पशुगणनेची होणार फेरतपासणी

रत्नागिरी : जिल्ह्यात २५ नोव्हेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत एकविसावी पशुगणना करण्यात आली. मात्र, ही पशुगणना वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. ती लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या पशुगणनेची अंतिम आकडेवारी शासनाच्या आदेशाने जाहीर करण्यात येणार आहे.

या पशुगणनेतील गाढव २१, हत्ती १, कुत्रे ६७८८, घोडे ३६, खेचर १२, डुक्कर २७३, शिंगरू ११, ससे ४१, मेंढे ३२० अशी नोंद करण्यात आली. मात्र, त्यांची फेरतपासणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पशुगणना पूर्ण
एकविसावी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते ३१ मार्च, २०२५ या कालावधीत करण्यात येणार होती. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे ती उशिरा सुरू करण्यात आली. ही पशुगणना मार्च अखेरपर्यंत पूर्ण झालेली नाही. त्यातच काही पशुंची गणना चुकीची करण्यात आली असल्याने या गणनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

डेटा सार्वजनिक करू नये?
एकविसाव्या पशुगणना पूर्ण करण्यात आलेली असली तरी त्याचा कोणताही सार्वजनिकपणे डेटा प्रसिद्ध करण्यात येऊ नये, अशी सक्त सूचना केंद्र शासनाकडून पशुसंवर्धन विभागाला देण्यात आली आहे. त्यामुळे या पशुगणनेत गणना झालेल्या पशुंची आकडेवारी जाहीर केलेली नाही.

गाय, म्हैस, गाढव झाली कमी
यापूर्वी २०वी पशुगणना घेण्यात आली होती. या पशुगणनेत गाय, म्हैस. गाढव, आदींचे आकडे घेण्यात आले. १९ व्या पशुगणनेच्या तुलनेत हे आकडे कमीजास्त आहेत. मात्र, यावेळी पशुधन वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले होते.

मेंढ्यांची संख्या वाढली
या पशुगणनेमध्ये ३२० मेंढ्यांची नोंद झालेली आहे. मात्र, या आकडेवारीची फेरतपासणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पशुधनाचे सर्वेक्षण अपूर्ण झालेले नाही. यानंतर राज्य, केंद्र शासनाकडे सर्वेक्षणाची आकडेवारी दिली जाणार आहे. शासनाच्या आदेशानंतर आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे- डॉ. रामचंद्र नरुटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 14/Apr/2025