देवरुख येथे विधी सेवा समितीतर्फे मार्गदर्शन

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने येथील माध्यमिक विद्यामंदिर येथे तालुका विधी सेवा समिती देवरूख यांच्या मार्फत लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण तसेच बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार यावर इयत्ता ६ ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. येथील वकील संघटनेचे सदस्य अॅड. पी. सी. चव्हाण, अॅड. ए. सी. पवार यांनी सविस्तर माहिती दिली.

यावेळी येथील दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश श्रुती पाटील उपस्थित होत्या. त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अॅड. लक्ष्मीकांत जाधव उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अशोक सप्रे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक चोरमाले यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 18/Apr/2025