रत्नागिरीतील प्राचीन विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 3 कोटींचा निधी

रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिराच्या सुशोभीकरणासाठी तीन कोटीचा निधी मंजूर केला.

श्री. सामंत यांनी विठ्ठल मंदिरास भेट दिली आणि विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी मंदिराच्या सुशोभीकरणाबाबत व इमारतीच्या विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली. यावेळी विठ्ठल मंदिर सुशोभीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. हे विठ्ठल मंदिर रत्नागिरीतील एक धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ आहे. या नव्या उपक्रमांमुळे मंदिराचा विकास अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा यावेळी उदय सामंत यांनी व्यक्त केली.

या वेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, माजी नगराध्यक्ष प्रमोद रेडीज, माजी नगरसेवक राजू तोडणकर, विजय पेडणेकर, राजन फाळके, प्रांताधिकारी जीवन देसाई, तसेच देवस्थानचे सदस्य उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 24-04-2025