जन्मनोंद दाखल्यासाठीच्या अटी-शर्ती शिथिल कराव्यात : शौकत मुकादम

चिपळूण : एक वर्षावरील विलंबाने करावयाच्या जन्म नोंदीबाबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचा शासनाने जो आदेश काढला आहे. त्याची पूर्तता संबंधित व्यक्तीला करणे अशक्य आहे. तरी त्यातील अटी व शर्ती शिथिल करून आवश्यक ते बदल करावेत, अशी मागणी माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.

एखाद्या महिलेची प्रसूती अन्य गावामध्ये किंवा बस, रेल्वे प्रवासादरम्यान झाली तर त्यांना दाखला मिळविण्यासाठी शासनाने काढलेल्या परिपत्रकात पूर्तताच केलेली नाही. त्याकरिता कोणती कागदपत्रे असावीत याचा उल्लेख नाही.

शासनाने नवीन जन्म व मृत्यू दाखला मिळविण्याचे जे परिपत्रक काढले आहे त्यामध्ये १२ अटींची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये काही अटींची पूर्तता करावयाची झाल्यास त्याला पाच ते सहा महिने कालावधी लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी जन्म, मृत्यू दाखला देण्याचे अधिकार न्यायालयाला देण्यात आले होते. त्यामुळे वकिलामार्फत कोर्टामध्ये प्रकरण दाखल करण्याची तरतूद होती. त्याला फार अवधी लागत असल्यामुळे तो आदेश रद्द केल्यामुळे संबंधितांना सोयीचे झाले होते. परंतु शासनाने नव्याने काढलेला आदेश संबंधितांना डोकेदुखी ठरण्याची आहे.

शक्यता तरी त्यामध्ये शैक्षणिक व नोकरी धोरणाचा विचार करून काढलेल्या आदेशातील जाचक अटी शिथील कराव्यात. त्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून संबंधित व्यक्तीला सदरचे दाखले लवकरच मिळू शकतात, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 28/Apr/2025