राजापूर : तालुक्यातील चव्हाणवाडी, करेल, निवेली या तीन गावांचे जागृत देवस्थान श्रीदेव माणेश्वर मंदिराचा वार्षिक यात्रोत्सव आज (ता. ३०) विविध धार्मिक विधींनी संपन्न होणार आहे.
या दिवशी सकाळी आठ वाजता श्रींवर अभिषेक व मंत्रघोष, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद व महिलांसाठी हळदी-कुंकू, सायंकाळी ७ वाजता महाआरती व साई म्युझिकल शो, रात्री नऊ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 30-04-2025














