गुहागर : राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-दोन अंतर्गत कंपोस्ट खड्डा भरून गुहागर तालुक्याचा ‘आपलं गाव स्वच्छ ठेवू’ या अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत मुंढर-कातकरी येथे पंचायतसमिती गुहागरचे गट विकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, मुंढर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अमिषा गमरे, ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रणिता रामाने, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे स्वच्छ भारत मिशनचे सर्वेश साळवी, श्री माजी उपसरपंच अजित गमरे मुख्याध्यापक दशरथ कदम उपशिक्षक श्री पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायत मुंढर कातकरी येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घनकचरा विलिगीकरण शेड बांधकामाची पाहणीसुद्धा गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी केली.
यावेळी श्री. भिलारे यांनी गावातील सर्व कुटुंबातील सदस्याने कचऱ्याचे कुजणारे व न कुजणारे व इतर असे वर्गीकरण केले पाहिजे. तसेच कुजणा-या पाला पाचोळयापासून व कचऱ्यापासून उत्तम प्रकरचे सेंद्रीय खत तयार करुन गावातील फळझाडे व शेतीसाठी त्याचा उपयोग करुन गाव स्वच्छ व सुंदर ठेवले पाहिजे. या अभियानाची प्रचार प्रसिध्दी व हा संदेश सर्व कुटुंबापर्यंत पोहचवला असे आवाहनही भिलारे यांनी यावेळी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 02/May/2025














