संगमेश्वर तालुक्यात ६ गावे, २० वाड्यांकडून पाणी टँकर ची मागणी

देवरुख : संगमेश्वर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या प्रचंड उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई च्या झळा पोहोचू लागल्या आहेत. तालुक्यामध्ये ६ गावे व २० वाड्यांनी टँकरची मागणी केली आहे. यानुसार २५ तारखेपासून तालुक्यात पहिला पाण्याचा टँकर धावू लागला आहे.

पाचांबे गावातील नेरदवाडी, सहाणेची, वाडी व शेनवडे दंगलवाडी या गावांसाठी हा पहिला टँकर शासकीय धावला आहे. प्रतिवर्षी १४ एप्रिल या दिनी तालुक्यात टँकर सुरू होतो. या वर्षी तब्बल ११ दिवसांनी उशिरा तालुक्यात टँकर सुरू करण्यात आला आहे. तालुक्यामध्ये ६ गावे व २० वाड्या तहानलेल्या आहेत. शासनाच्या निकषानुसार या गावांची पंचायत समिती व तहसीलदार कार्यालय यांच्याकडून संयुक्त पाहणी होऊन आवश्यकता असल्यास टँकर सुरू केला जातो. यानुसार मागणी केलेल्या गावांची पाहणी करून टँकर सुरू केला जाणार आहे.

कुंभारखणी बुद्रुक तांबळवाडी व मधली वाडी, पिरंदवणे घेवडेवाडी, निवई वाडी, किंजळेवाडी, मळेवाडी, पाचांबे गावातील नेरदवाडी, जखीण टेप, मेढे व सहाणेची वाडी, कोसुंब येथील फुगेची वाडी, बौद्धवाडी, फेपडेवाडी, तुरळ धोगडेवाडी, पाचकलेवाडी, हरेकर वाडी, मराठवाडी, सुवरेवाडी व गुरववाडी, शेनवडे दंगलवाडी या गावांमध्ये भीषण पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. यामुळे या गावांच्या ग्रामपंचायतीकडून टँकरसाठी प्रस्ताव तयार करून पंचायत समिती प्रशासनाकडे देण्यात आले आहेत. यानुसार पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाने दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 03/May/2025