रत्नागिरी : अयोध्येहून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत

रत्नागिरी : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येला घेऊन गेलेली कोकणातील पहिली रेल्वे रत्नागिरीत परतली. त्यांचे स्वागत समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, गृहपाल विनोद देसाई, रवींद्र कुमठेकर आदींनी केले.

या गाडीतून प्रवास करून आलेल्या पाली येथील कस्तुरबाई गोंधळी यांनी सांगितले, प्रवासात काहीच त्रास झाला नाही. जेवणाची, राहण्याची सोय उत्तम होती. मंदिर परिसर फिरून दाखवले व दर्शन चांगले झाले. राजापूर येथील उल्हास खडपे म्हणाले, एकाही ज्येष्ठाला त्रास होणार नाही. शासनाचे अधिकारी-कर्मचारी काळजी घेतील, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले होते. त्यांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे अत्यंत सुखरूपपणे आमची सोय केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 03/May/2025

Happy journey english